जिल्ह्यात ठिकठिकणी म.गांधी व शास्त्रींना मानवंदना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी/वार्ताहर भंडारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

सार्वजनिक वाचनालय भंडारा भंडारा : सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल हे होते. कार्यवाह डॉ. जयंत आठवले यांनी म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. अध्यक्षीय भाषणातून धनंजय दलाल यांनी महात्मा गांधी व भंडारा जिल्ह्याच्या भेटींचे स्मरण करून दिले. याप्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी हर्षल मेश्राम, डॉ. प्रकाश मालगावे, प्रा. सुमंत देशपांडे, ईश्वरलाल काबरा, बाळा गभने, डॉ. उल्हास फडके, डॉ.जगदीश निंबार्ते, ग्रंथपाल घनश्याम कानतोडे, दिनेश हरडे, सुधीर खोब्रागडे, मारोती वाघमारे, बाबुराव गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *