एक हजाराच्यावर युवकांचा शिवसेनेत प्रवेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभेतील एक हजारांच्या वर युवकांनी आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश घेतला. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात या कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा घालून प्रवेश देण्यात आले. येथील मंगल मूर्ती मंगल कार्यालयात आयोजिय या भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले संजय कुंभलकर यांनी केले होते. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे गेल्या अडीच वर्षातच भंडारा पवनी विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्यकरीत विधानसभेचा चेहरा मोहरच बदलण्यात आला आहे.

या विकास कामांना बघता लोकांचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ही वाढत जात आहे. काही दिवसां पूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेणारे संजय कुंभलकर यांनी आज भव्य प्रवेश सोहळा आयोजित करून एक हजार पेक्षा अधिक युवकांना शिव सेना (शिंदे गटात) प्रवेश करवीला. त्यांच्या सह आज डॉ अनिल कुर्वे, प्रा. श्रीकांत मानकर यांनी सुद्धा यावेळी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलतांना आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, भंडारा विधानसभेचा विकास आणि भंडाºयाला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून देणे आणि त्या माध्यमातून भंडारा, पवनी येथील युवकांना रोजगार मिळवून देणे हा त्यांचा ध्येय राहीला आहे आणि तो लवकरच पूर्ण होतांना सुद्धा दिसत आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येत झालेल्या युवकांच्या पक्ष प्रवेशामुळे असे वाटायला लागले आहे की, माझे ‘आपला भंडारा, विकसित भंडारा’ हा ध्येय पूर्ण व्हायला उशीर लागणार नाही. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धूर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन सेलोकर, शहरप्रमुख मनोज सकोरे, यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *