जिल्ह्यातील ११९ रस्त्यांची हालत खस्ता आठ पूल कोसळण्याच्या मार्गावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दररोज लाखो लोकांची वर्दळ असलेल्या जिल्ह्यात ११९ रस्त्यांची हालत खस्ता झाल्याची कबुली खुद्द जिल्हा परिषद देत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवर यमराज टपून बसला आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी ४२ कोटी ५३ लाख रुपये लागणार असल्याने ती मागणी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे केली आहे. जिल्ह्यातील ११९ रस्त्यांवर प्रत्येकी एक किलोमीटरच्या आत शेकडो खड़े आहेत. हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसºया खड्ड्यात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलत नाही. या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. या खड्डयांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.

जिल्ह्यातील ११९ रस्ते जीर्ण झाले असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत, अशी कबुली जिल्हा परिषद देत असताना जिल्ह्यात दौºयावर जाणाºया जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह सर्वच लहान- मोठ्या अधिकाºयांना हे रस्ते दिसत नाही काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. रस्त्यांची हालत खस्ता झाली असून, या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. येथील रस्त्यांवर मोठे खड्डे असून, त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडते. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अनेकांचा बळी गेला. उदासीन असलेल्या प्रशासनाने जागे व्हावे हा नागरिकांचा सूर आहे. या रस्त्यांवरील खड्डयांनी अनेकांचा जीव घेतला. हा रस्ता आणखी किती बळी घेणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. या रस्त्याच्या कामांसाठी लागणारा निधी ४२ कोटी ५३ लाख एवढा आहे. या निधीची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. यापूर्वी तीन कोटी ८९ लाख ६० हजार रुपये खर्च करून रस्ते व पूल बांधण्यात आले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *