वन्यजीव सप्ताह तसेच गांधी जयंती निमित्त सायकल रॅली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- संपूर्ण महाराष्ट्र मध्ये १ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर हा वन्यजीव प्राणी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये वन विभाग, संडे सायकलींग ग्रुप, सेवा संस्था, हिरवळ संस्था, सारस संरक्षण समिती अशा विविध सामाजिक संस्था द्वारा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच गांधी जयंती निमित्त सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅली दरम्यान गोंदियातील ८३ वर्षीय धावक मुनालाला यादव यांनी गांधी जी यांची वेशभूषेत आल्याने ते या वेळी आकर्षण ठरले होते. गोंदिया जिल्हा हा वन्य प्राण्यांसह अनेक जैविक वनस्पतीने नटलेला जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जैविक वनस्पती आणि वन्यजीव प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून लोकांमध्ये जनजागृती करून वन्यप्राणी इतर महत्त्वाच्या वनस्पतींची कशाप्रकारे रक्षा करण्यात येईल. आणि पर्यावरणाचे रक्षण कशाप्रकारे करता येईल तसेच आपले शरीर सुदृढ कशाप्रकारे ठेवता येईल असा सामाजिक संदेश देत आज वन विभाग द्वारे गोंदिया शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तर गोंदिया शहरात सायकल रॅली काढत सायकल चालव पर्यावरण बचाव झाडे लावा झाडे जगवा सेव वाईल्ड लाइफ यावेळी असे स्लोगन देण्यात आले तर या सायकल रॅली मध्ये मोठ्या संख्येने वन विभागासह सायकलिंग संडे व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.

यावेळी उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग प्रमोदकुमार पंचभाई, सारस संवर्धन समितीचे सदस्य व अध्यक्ष सेवा संस्था सावन बहेकार सायकलिंग संडे चे सचिव रवि सपाटे, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक,भगीरथ जीवांनी, उदय निर्वाण, हिरवळ संस्थेचे रुपेश निंबार्ते, सेवा संस्थेचे शशांक लाडेकर, अविजित परिहार, दुष्यंत आक्रे, गौरव मटाले, टिणू लाडेकर. सायकलिंग ग्रूप चे निखिल बहेकार, जितेंद्र खरवडे, अजित शेंमारे, दीपक गाडेकर, अरुण बंनाटे, मुंनालाल यादव, नरेंद्र बेलगे, कृष्णा शेंडे, राज राहुल, शुभम भिमटे, नवीन दहिकर, आशा तिडके, दिपाली वाढई, श्रद्धा यादव, वैशाली भांडारकर, त्रिवेणी उईके, भावना शेंडे, गार्गी रहांगडाले,पलक कोडडीया तसेच वन विभागाचे कर्मचारी इत्यादी नी सायकल रॅली मध्ये सहभाग घेतला .होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *