चंद्रपुरात ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

भंडारा पत्रिका / चंद्रपूर : बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे, येथील एका मोठ्या शाळेत ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार केली आणि कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे यालाअकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. अमोल लोडे आरोपीचे नाव असून चंद्रपूर येथील नामांकित शाळेत हा शिक्षक आहे. सोबतच आरोपी शिक्षक युवक काँग्रेसचा अध्यक्ष सुद्धा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेत क्लासेस करता आली होती. यावेळी अमोल लोडे या आरोपी शिक्षकाने मुलीला आॅफिसमध्ये नेले. आॅफिसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला धमकावत दोन गोळ्या खान्यासाठी दिल्या. यानंतर पीडित मुलीवर त्याने कार्यालयात बलात्कार केला. यानंतर तिला धमकावले तसेच तिला आणि तिच्या घरच्यांना जीव मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली.

या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. आरोपी हा राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाºया कोरपना येथील शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असून तो एका खासगी शाळेत शिक्षक आहे. आरोपी हा उन्हाळ्यात शाळेत अतिरिक्त वर्ग घेत होता. या साठी तोमुलांना शाळेत बोलवत होता. याच क्लासमध्ये त्याने मुलीला बोलवत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, भीतीपोटी मुलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही. मात्र, मुलीला त्रास होत असल्याने या घटनेची कुणकुण घरच्यांना मिळाली. या नंतर मुलीला पालकांनी विश्वासात घेऊन तिला या प्रकरणी माहिती विचारली. यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत या अमोल लोडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून अमोलवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *