अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने वरठी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई करीत २६ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमित गोपीचंद गाढवे, वय २७ वर्ष, रा. पारडी ता.मोहाडी, जि. भंडारा व प्रदीप राधेश्याम बांडेबुचे, वय २६ वर्ष, रा.रोहा,ता.मोहाडी, जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. स्थागुशाचे पथक वरठी पसिरात गस्ती घालत असतांना वरठी इथुन दाभाकडे रेतीची वाहतुक करणारा हायवा कंपनीचा ट्रक दिसुन आला.

पोलीसांनी त्या ट्रकला थांबवुन ट्रक चालकाला रेती वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली असता ट्रक चालकाने परवाना नसल्याचे सांगीतले.त्यामुळे पोलीसांनी ट्रक क्र.एमएच ३६ एए-६००७ किंमत २६ लाख रूपये व ट्रकमधील ६ ब्रास रेती किंमत ३६ हजार रूपये असा एकुण मिळुन २६ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर, पोउपनी शिवराज जाधव, पोहवा/कैलास पटोले, पोहवा/ विजय राऊत , पोनासंदीप भानारकर यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *