प्रशांत किशोर आता राजकीय आखाड्यात

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली आहे. पाटणा या ठिकाणी बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष बडा करीश्मा करुन दाखवेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मनोज भारती हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील. प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाची घोषणा पाटणा येथील व्हेटरनरी महाविद्यालयाच्या मैदानावर केली. यानंतर ते लोकांना संबोधित करत म्हणाले की मागच्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरु होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *