भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जलाशय व कालवे हे ब्रिटिश कालीन आहेत. ४० ते ४५ गावच्या शेतकºयासाठी वरदान ठरलेला व शेतकºयांना सुजलाम सुफलाम करणारा जलाशय हा ब्रिटिश कालीन असला तरी याकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष केले जात आहे. शेतकºयांना पाण्याची गरज असताना कालवा फुटल्यामुळे शेतकºयात पाटबंधारे विभागाच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. कालवा फुटून सापडेल त्या मार्गाने पाणी सैरावैरा पळून त्या पाण्याने शेतकºयांचे धान पीक जमिनीत लोटले आहे, पिकाची नासाडी झाली आहे. कालवा फुटला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाला मिळताच त्यांनी तडकाफडकी गेट बंद केले आहे. गावात पाणी शिकण्याची भीती वर्तविण्यात आली होती. परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे.
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ चे सुमारास मुख्य उजव्या कालव्यात टाकीतील पाणी सोडण्यात आले होते. पाहता पाहता कालवा ओरμलो होऊन फुटला. चांदपूर जलासह ब्रिटिश कालीन असल्याने कालवे ठिकठिकाणी जीर्ण झाले आहेत. रब्बी आणि खरीप हंगामात धान पिक लागवडीसाठी पाणी सोडले जाते. कालवे फुटण्याची शक्यता असतानाही कालव्याची दुरुस्ती न करता पाणी सोडले जाते. वर्षभर नहर व कालव्यांची दुरुस्ती केली जाते परंतु ते निकृष्ट दर्जाचे असते. सदर काम हे फक्त मलिंदा खाण्यासाठीच केले जाते. कालवा फुटल्यामुळे कालव्याचा मलबा, रेती व गाळ शेतकºयांच्या शेतात शिरून नुकसान झाले आहे. दुरुस्ती कामासाठी कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे निविदा मंजूर केली जाते मात्र, पाणी वाटपा आधी कालवे व नहराचे मूल्यांकन केले जात नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.