भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना राज्य कर्मचारी कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल शिर्के, राज्य महिला कार्यकारी अध्यक्ष रूपाली नाकाडे यांच्या सूचनेनुसार ८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद राष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाय स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे या मुख्य मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य तालुका महिला कल्याणकारी संघटनाच्या मोहाडी येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयासमोर गुरुवार दि. ३ आॅक्टोबर २०२४ ला सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत १८६ पैकी १२६ महिलांनी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले.
प्राप्त निवेदनात आमचे कुटुंब प्रमुख, पालक, आधार, तालुका पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की, वरील एकमेव न्याय मागणी सोबत दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे पूर्ण होणेसाठी मुख्यमत्री, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना कळवून मागणी पूर्ततेचा शासन निर्णय दिनांक दि.२ आॅक्टोबर २०२४ रोजीपर्यंत निर्गमित करून अमलबजावणी करण्यासाठी विनती करावी, जेणेकरून सध्या चालू असलेले असहकार आंदोलन, आमरण साखळी उपोषण व सदरचे बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय राज्य संघटनेला घेनेस मदत होईल. तसेच राज्य संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाºया तालुका स्तरीय अधिवेशन तथा जनजागृती मेळाव्याला आवश्यक ते सहकार्य करणेसाठी व सर्व प्रशासकीय अधिकारी यांना उपस्थित राहून नार्गदर्शन करणेसाठी आपले स्तरावरून कळविण्यात आले होते.
उक्त मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही न्यायासाठी संविधानिक पद्धतीने गुरुवार दि.३ आॅक्टोबर २०२४ ला अध्यक्ष किरण भैरम उसरला, उपाध्यक्ष रजनी श्रीपात्रे जांब, सचिव शिल्पा रंगारी देव्हाडा बूज, कोषाध्यक्ष करुणा चोपकर आंधळगाव, सहसचिव लक्ष्मी सव्वालाखे पाचगाव, संघटक प्रिया राहुल देऊळगाव, सिमा बांडेबुचे रोहा, मार्गदर्शक सिंधु हटवार सालई, पौर्णिमा भोयर रोहा, वैशाली खोब्रागडे देव्हाडा खुर्द, समिती प्रचारक पूनम पुरुषोत्तम लेंडे मोहंगावदेवी, मनिषा शेंडे आंधळगाव, राजेश्वरी चन्ने रामपूर, सदस्य सुनिता कमाने दहेगाव, वनिता डहाके पालडोंगरी, निशा बुराडे मुंढरीखुर्द, मंजुषा निंबार्ते पारडी, कांचन झंझाड वासेरा, भाग्यश्री मलेवार कुशारी, संगीता कांबळे कान्हळगाव यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत कामबंद आंदोलनात उमेद अभियानातील कंत्राटी तालुका व्यवस्थापक अधिकारी सुनिल पटले,प्रभाग सन्मव्यय संजय लव्हाळे,कृषी व्यवस्थापक विजय बालपांडे,मत्स्य व्यवस्थापक नितेश डोंगरे,पशु व्यवस्थापक सतिश चेटूले,अंकुश बारई सहभागी झाले होते.