भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन राज्य सरकार मधील अर्थमंत्री अजित पवार यांनी मतांच्या राजकारणासाठी महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचेच पक्षाचे आमदार राजु कारेमोरे महिलांबाबत अश्लील भाषेचा वापर करुन या बहिणींना धमकावतो. हे योग्य आहे का? त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार आपल्या आमदारावर कार्यवाही करणार काय? राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना, महिलांवर बलात्काराचे प्रकरण वाढले असतांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांना अश्लील भाषेत बोलणाºया सरकारमधील आमदार राजु कारेमोरे यांचेवर पारदर्शक कार्यवाही करणार काय? असा सवाल माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्य सरकार मधील महायुतीच्या सर्वच पक्षाने सपाटून मार खात विधानसभा निवडणुकीत हीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून “मताची झाली कडकी म्हणुन बहीण लाडकी*” योजनेतुन महिलांना खुश करणे सुरु आहे. परंतु तुमसर चे आमदार राजु कारेमोरे मात्र याच बहिणींना अश्लील भाषेत शिवीगाळ करून तोंडसुख घेत आहेत.
जनसन्मान यात्रेचा माध्यम घेऊन अर्थमंत्री अजित पवार तुमसर येथे आले असता या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी *तुमसर नगरपरिषद महिला मुख्याधिकारी वैद्य मॅडम यांनी मदत केली नाही हा विषय घेऊन आमदार राजु कारेमोरे यांनी धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करुन पाहून घेण्याची धमकी दिली हा विषय सोशल मीडिया व टिव्ही चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला. त्यामुळे एकीकडे राज्यातील महिलांना लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांबाबत अश्लील भाषेचा वापर करायचा अशा आमदारावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारत घेऊन पारदर्शक कारभारासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा आमदारावर कार्यवाही करणार काय? यापूर्वी सुध्दा तुमसर उपजिल्हारुग्णालयात आमदारांनी महिला डॉक्टर व कार्यरत परिचारिका यांना शिवीगाळ करुन महिलांना अपमानजनक वागणुक देण्याची शाई वाळली नसतांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील मोहाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मतमोजणी परिसरात आमदार राजु कारेमोरे यांचे मित्र संशयास्पदरित्या वावरत असताना मोहाडी पोलिसांनी कार्यवाही केली असता आमदार राजु कारेमोरे यांनी पोलिसांनी माज्या मित्रांचे पन्नास लाख रुपये पोलिसांनी चोरल्याचा खोटा आरोप करून मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घालत पोलीस निरीक्षक देशपांडे व कार्यरत पोलीस कर्मचारी यांच्या गृहिणी बाबत कमरेखालच्या भाषेत शिव्या घातल्या आणि दुसºया दिवशी कार्यवाही होण्याचे भीतीने पत्रकार परिषदेत पोलिसांची जाहीर माफी मागुन प्रकरण थांबविण्यात आले.
मात्र यापूर्वी या क्षेत्राचा आमदार म्हणून बांधकाम कामगारांना पेटी वाटप करतांना एका महिला पोलिस अधिकारी कडून विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी माझ्या विरोधात असे कृत्य केले असल्याचे कोणतेही पुरावे, आॅडियो क्लीप किंवा व्हिडिओ क्लीप नसतांना माज्याविरोधातील राजकीय नेत्यांना सुध्दा माहीत होते की चरण वाघमारे असे कृत्य करूच शकत नाही तरीसुद्धा माज्याविरोधात माज्या अटकेसाठी राजकीय सूडभावनेतुन पोलीस स्टेशन वर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.विरोधकांची भावना लक्षात घेऊन मी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माज्याविरोधात चौकशीची मागणी केली होती.पण आज एवढे मोठे पुरावे आॅडियो क्लीप, व्हिडिओ क्लीप असताना मात्र बाकीचे सर्वच नेते शांत बसले आहे.
अशातच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसतांना पोलीस विभागाकडून कार्यवाहीचे आदेश देऊन खोट्या गुन्ह्यात फसऊन सहा दिवस जेलमध्ये टाकले व तिकीट कापुन माझी राजकीय हत्या करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.पण आजही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत माज्या बाबतीत अटकेसाठी पुरावे नसतांना जो निकष लावला तो निकष एवढे सारे पुरावे, आॅडियो क्लीप, व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून महिलांबाबत अनेकदा अश्लील शब्दप्रयोग करणाºया आमदार राजु कारेमोरे यांचेवर देवेंद्र फडणवीस लावतील का? आणि गृहमंत्री म्हणुन पारदर्शक कार्यवाही करणार काय ? असा सवाल माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी प.स. सभापती नंदुभाऊ रहांगडाले, उपसभापती हिरालाल रोटके, विकास फाऊंडेशन चे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, तुमसर विधानसभा प्रमुख ललित शुक्ला, प्रशांत लांजेवार, विश्वनाथ कुकडे, दिगंबर कुकडे,सुधीर गिरहेपुंजे, बाळू भाऊ गोखले,इंद्रजीत येळणे , भाऊलाल बांडेबुचे, ज्ञांनबा भोयर, हेमंत बांते,महेश कळंबे, मधूकर पटले, गितेश ठोंबरे, संजय खंडाईत आदी उपस्थित होते.