भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात साकारत असलेली ५१ फूट उंच श्रीरामाची भव्य मूर्ती आता नुसतेच धार्मिक महत्त्वाचे स्थान राहणार नाही, तर हे ठिकाण भव्य पर्यटन केंद्र म्हणूनही अधोरेखित होईल. आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि दृढ इच्छाशक्तीतून उभी राहणारी ही मूर्ती भविष्यात भंडाराला पर्यटनाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी सज्ज होत आहे. मूर्ती निमार्णाचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे. श्रीरामाच्या या विशाल मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लक्ष्मण झुला’ सारख्या आकर्षक पुलाचेही बांधकाम करण्यात येत आहे. हा झुला केवळ येथील पर्यटकांसाठी एक प्रवासाचा मार्ग नसून, तो आध्यात्मिक अनुषंगाने श्रीरामाच्या जीवनातील सहनशीलतेचे आणि धैर्याचे प्रतीक ठरेल. लक्ष्मण झुला हा विशिष्ट धैर्याचे उदाहरण मानले जाते. ज्यात माणूस आपल्या जीवनाच्या संघर्षांमध्ये विश्वासाने आणि धैर्याने वाटचाल करू शकतो व आपले ध्येय गाठू शकतो. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. संगीताच्या तालावर थुईथुई नाचणारी पाण्याची कारंजे हे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतील, या शंका नाही.श्रीरामाची ही मूर्ती त्याच्या उंचीने आणि कलेने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल.
रामभक्तांची ओढ या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी लागणार आहे. हे एक अद्वितीय उदाहरण असेल ज्यात आध्यात्मिकता, भव्यता आणि स्थापत्यकलेचा संगम अनुभवायला मिळेल. या निर्मितीमुळे भंडारा शहराला केवळ धार्मिक महत्त्वाचेच नाही तर पर्यटनाच्या दृष्टीने देखील नवीन ओळख मिळेल आणि भंडारा येथील रोजगाराला सुध्दा नवीन चालना मिळेल. भंडारा शहरांमध्ये साकार होत असलेली ५१ फुट जय श्री रामाची मूर्ती ही राज्यातीलच नव्हे तर देशभरातील उंच मूर्तींमध्ये हे एक स्थान असणार आहे. जसे गुजरातमधील ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ ही लोखंडाच्या दृढतेची प्रतीक म्हणून ओळखली जाते, तसंच भंडारातील ही श्रीराम मूर्ती आपली धार्मिक आणि सांस्कृतिक महत्ता प्रस्थापित करेल. येथून पुढे हे ठिकाण केवळ भक्तांसाठी नाही तर विविध कला, संस्कृती आणि स्थापत्यकलेच्या अभ्यासकांसाठी एक प्रेरणादायक स्थान बनेल. श्रीरामाच्या या मूर्तीच्या स्थापनेमुळे भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण भंडाराकडे वाढेल, आणि या मूर्तीचे सौंदर्य, उंची आणि परिसरातील निसर्ग एकत्र येऊन एक अद्वितीय अनुभव देईल.
शहरवासीयांची उत्कंठा वाढली
श्रीरामाच्या मूर्तीचे निर्माण कार्य हे दिवस-रात्र सुरू आहे. नियोजनबद्ध व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मुर्तीचे निर्माण कार्य होत आहे. हे कार्य बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक परिसरात एकत्रित होतात. नागरिकांनी सांगितले की, त्यांना मूर्तीच्या अनावरण सोहळ्याचे उत्कंठा लागलेली आहे.
शहराची ओळख स्थापित होणार – आमदार नरेंद्र भोंडेकर
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले की विकास कायार्सोबतच भंडाºयाचा सौंदर्य वाढले पाहिजे. सांस्कृतिक कला व स्थापत्य क्षेत्रामध्ये देखील काही नाविन्यपूर्ण व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. यातूनच श्रीरामाच्या भव्य मूर्ती ही संकल्पना पुढे आली. या मूर्तीच्या स्थापनेमध्ये त्यांच्या खारीच्या वाटा असणार आहे याबद्दल त्यांना अभिमान वाटतो.