तुमसर तालुक्यातील खापा परिसरात उभे धान पीक भुईसपाट

भंडारा पत्रिका/ काका भोयर खापा (तुमसर ) : तुमसर तालुक्यात व खापा परिसरात दिनांक ३ व ४ आॅक्टोंबर रोजी दोन दिवस ३.३० ते ५ वाजताच्या सुमारास वादळ वाºयासह पावसाने जोरात मुसंडी मारली असून धान पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे उभे असलेल्या शेतकºयाच्या धान जमीन दोस्त व भुईसपाट झालेला आहे. कापून ठेवलेल्या धान पिकाच्या कडपा व भुई सपाट झालेल्या धानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे. दिवाळी पूर्वी हलक्या वाणाचा धान कापणीला आला असताना या वादळ वाºयामुळे शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे धान पीक चांगले व जोशात आले होते, परंतु गुरुवार पासून सुरू असलेल्या वादळ वारा व पावसाने धान पिकाचे व भाजीपाल्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतशिवारात धान पीक डौलाने उभ्या असताना शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु वादळी वाºयासह दमदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे वाचलेला धान पीक नष्ट झाला. कापणीसाठी आलेले हलक्या धानाचे वाण भुईसपाट झाले.

एवढेच नव्हे तर शेतकºयाच्या धान उत्पादनामध्ये सुद्धा घट येण्याचे प्रमाण वाढले आहेत. बळीराजाला कधी अस्मानी सुलतानी संकटांना सामना करत करत शेती मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने करत असतो. पण असे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयाचे कंबरडेच मोडले आहेत. अशा प्रसंगी शेतकºयांचा प्रपंच रुपी गाडा, बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ, अशा विविध समस्या त्या शेतकºयांच्या मागे लागूनच असतात. काल गुरुवार आणि शुक्रवारच्या पावसाने खापा परिसरात खरबी, मांगली, मांडळ, सालई, विहीरगांव, काटेबामणे, हसारा, हिंगणा, परसवाडा, पांजरा व तुमसर तालुक्यात ३ व ४ तारखेला वादळ वाºयासह पावसाने सुरुवात केल्याने या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मात्र हतबल झाला असून आर्थिकदृष्ट्या देशोधडीला जात आहे. शासन प्रशासनाने शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. याकडे शासनाने व संबंधित लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांच्या वतीने होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *