भंडारा : सरपंच संघटना तालुका भंडाराच्या वतीने बाबुलाल भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कृत ग्रामपंचायत व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण, स्वछता व ग्रामविकासाच्या बाबतीत भंडारा तालुका नेहमीच चर्चेत असतो. या तालुक्याने राज्यात आपली छाप उमटवली आहे. ग्रामपंचायत बेलाच्या सरपंच शारदा गायधने यांनी माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. ग्रामपंचायत खरबी सरपंच गणेश मोथरकर यांनी विभागातून प्रथम क्रमांक मिळवला. स्मार्टग्राम स्पर्धेत ग्रामपंचायत कोथुर्णा सरपंच प्रदीप गायधने यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत ग्रामपंचायत दवडीपार (बाजार) सरपंच राजकिरण मेश्राम यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
भंडारा तालुक्यातील उल्लेखनीय कामगीरीचे औचित्य साधून सरपंच संघटनेत रिक्त झालेल्या पदाची निवड सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल भोयर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष जयराम (आशू) वंजारी, सचिव शारदा गायधने, प्रसिद्धी प्रमुख रुपेश आतिलकर, ज्योती नंदेश्वर, संपर्क प्रमुख राजकिरण मेश्राम, कोषाध्यक्ष रामभाऊ मदणकर, व्यवस्था प्रमुख जगन्नाथ वाघमारे व सल्लागार आरजू मेश्राम, तर कार्यकारी सदस्य म्हणून सहसराम कामळे, विनायक टांगले, पुरुषोत्तम कामळे, गणेश मोथरकर, कुसुम कामळे, समता गजभिये, पुष्पा मेश्राम, चंदन वासनिक, विलास बनसोड, मंजुषा खंगार, राधा चकोले, मुलचंद ईश्वरकर, स्वाती हुमणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.