तुमसर : विज्ञान युगात खरंच चमत्कार होतात. यावर कोणीही सुबुद्ध माणूस विश्वास ठेवणार नाही. परंतु जिथे गोष्ट श्रद्धेची येते तिथे मात्र नतमस्तक व्हावेच लागते. वर्तमानात त्या चमत्काराच्या खाणाखुणा असतील तर मग नाइलाजाने का होईना विश्वास मात्र ठेवावाच लागतो. हावडा- मुंबई या प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दोन लोहमार्गाच्या मधोमध काली मातेचे मंदिर आहे. भारतात कुठल्याच रेल्वे स्थानकावर लोहमार्गाच्या मधोमध असे मंदिर नाही. तुमसर रोड येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारच्या मधोमध माँ काली मातेचे मंदिर आहे. इंग्रजांनी हे मंदिर हलविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे मंदिर ते हलवू शकले नाही अशी माहिती आहे. शंभर वर्षे जुन्या या मंदिराशी अनेक आख्यायिका जुळलेल्या आहेत.
भारतात आपल्या साम्राज्य विस्ताराकरिता ब्रिटिशांनी लोहमागार्चे जाळे विणले, त्यात मुंबई- हावडा हा प्रमुख लोहमार्ग होता. या लोहमार्गाचे काम तुमसर रेल्वे स्थानकापर्यंत आले होते, ब्रिटिशांना तुमसर तालुक्यातील डोंगरी व चिखला तसेच मध्य प्रदेशातील तिरोडी येथून मैग्नीजचे साठे नेण्यासाठी त्यांना या रेल्वे मागार्ची गरज पडली. १९२३ मध्ये तुमसर ते तिरोडीपर्यंत अत्यंत कठीण मार्गावर त्यांनी लोहमार्ग टाकला. त्यात तुमसर रोड येथे मॅग्नीज साठवण्याकरिता याडार्चे स्वरूप दिले.
माँ काली मंदिर येथे स्वयंभू आहे. परंतु रेल्वे ट्रॅकवर येणारे हे मंदिर भुईसपाट करायचा घाट ब्रिटिश अधिकाºयांनी घातला, स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. परंतु ब्रिटिश अधिकाºयांनी है मंदिर पाडण्याचे काम हाती घेतले. पण काय आश्चर्य अनेकांनी हात लावूनही देवीचा साधा दिसणारा दगड हलविता आला नाही. त्यानंतर इंग्रजांनी हा साधादिसणारा दगड हलविण्याकरिता मोठे क्रेन बोलावले पण त्या अजस्त्र क्रेनच्या साखळ्या तुटून पडल्या होत्या. दगड जागेवरून तसूभरही हलला नाही. काही दिवस या मार्गावरील काम बंद पडले होते. या भागातील नागरिकांनी इंग्रज अधिकाºयांना सल्ला दिला की, मंदिर हलविण्याकरिता साधूची मदत घ्यावी. अधिकाºयांनी तसे केले. परंतु साधू येथे आल्यावर त्यांनी माँ काली मातेला वंदन करून निघून गेले. अखेर नाइलाजाने इंग्रज अधिकाºयांनी येथून लोहमार्ग वळविला होता.
नवरात्रोत्सवात भाविकांची होते गर्दी…
तुमसर रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्थानिक भाविक रोज पूजा करतात. देवीच्या पूजेत रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतात. माँ काली माता हे दुर्गा मातेचे एक रूप आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या काळात येथे भाविकांची गर्दी होते.