अत्याचार प्रकरणी तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतेच समोर आली आहे.याप्रकरणी सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करून त्या मुलीचा शोध घेण्यात आला व अत्याचार करणाºया त्या तिन्ही आरोपींना सिहोरा पोलिसांनी अटक करून ४ आॅक्टोंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. अल्पवयीन मुलगी मामाच्या गावी जात असल्याचे सांगून १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडली .मात्र मुलगी मामाच्या गावी पोहोचली नसल्याचे कळताच कुटुंबीयांच्या मनात शंका निर्माण झाली.आपल्या मुलीला कुणीतरी अज्ञातांनी पळून तर नेले नाही ना? असा अंदाज वर्तवून सिहोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

सदर प्रकरणात सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला व तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्या पिडीत मुलीचा शोध घेण्यात आला व सदर प्रकरणातील आरोपी चैतराम वानखेडे वय २९ वर्षे रा. सुकळी तालुका मोहाडी, अविनाश राऊत वय २३3 वर्षे रा. तुमसर तालुका तुमसर व अविनाश उर्फ सागर खुडशाम वय २३ वर्षे रा.रनेरा तालुका तुमसर यांना ४ आॅक्टोंबर रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींनी पीडीतेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या बयानावरून तिन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्या तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम व पोलीस अमलदार तिलक चौधरी हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *