भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : साकोली येथे रविवारी कांग्रेस पक्षातर्फे संभावित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भंडारा विधानसभेसाठी पूजा ठवकर यांनी शेकडो समर्थकांच्या साक्षीने प्रबळ दावेदारी सादर केली. प्रदेश कॉंग्रेसतर्फे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर चे माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी भंडारा विधानसभेसाठी ११ संभावित उमेदवारांनी दावेदारी सादर केली. त्यामध्ये पूजा ठवकर या एकमेव महिला उमेदवार प्रबळ दावेदार ठरल्या. समाजात विभिन्न स्तरावर महिला सक्षमीकरण अभियान राबविले जाते. महिलांना पुरुषांच्या बरोबरीत पन्नास टक्के वाटा असावा अशी भावना सध्या समाजात जागृत आहे. त्यामुळे पूजा ठवकर यांची दावेदारी विशेष लक्षवेधी ठरत आहे. पूजा ठवकर ह्या बेला ग्रामपंचायतीच्या पाच वर्ष पद भूषविलेल्या माजी सरपंच आहेत.
कॉंग्रेस पक्ष हा महिला सक्षमी करन धोरण राबविणारा पक्ष आहे. महिला धोरणासंदर्भात कॉंग्रेसपक्ष राष्ट्रीय स्तरावर सदैव आग्रही असतो. त्यामुळे एक महिला या नात्याने पक्षश्रेष्ठी नक्कीच आपल्याला पक्षातर्फे उमेदवारी देतील असा मानस त्यांनी यावेळी प्रकट केला. भंडारा गोंदिया जिल्ह्यातून एक महिला या नात्याने तिकीट आपल्याला नक्की मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी पूजा ठवकर यांच्यासाठी क्षेत्रातून अनेक महिला मुलाखतस्थानी उपस्थित झाल्या होत्या. हे विशेष. यावेळी त्यांच्यासमवेत शेकडो समर्थक स्वयंस्फूर्तीने एकत्र झाले होते. यावेळी पूजा ठवकर यांच्या समर्थकांनी ‘‘पुजा ताई आगे बढो हम तुम्हारे साथे है,हमारा आमदार कैसा हो,पुजाताई ठवकर जैसा हो’’ च्या घोषणा देत परिसर दणाणुन सोडला.