भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : दोन अल्पवयीन विद्यार्थिनीना व्हाट्सएपवर मॅसेज टाकण्याची चॅटिंग केल्या प्रकरणी एका खाजगी विद्यालय ात कार्यारत असलेल्या पवनी येथील शिक्षकावर पवनी पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असतांना न्यायालयाने दुसºयाच दिवशी जमानतीवर सुटका केल्याने पवनीकर जनतेत प्रचंड रोष व्यक्त केल्या जात असून न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उठविले जात आहेत. सदर प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते हरीश तलमले, मयुर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी दिली. प्राप्त महितेनुसार भोजराज दिघोरे नावाचा शिक्षक पवनीतील नामवंत शाळेत कार्यरत होता.
चालू सप्ताहात त्याने इयत्ता १० वितील एका विद्यार्थ्यांनीच्या मोबाईल फोनवर व्यभिचार करण्याच्या हेतूने रात्री १२ वाजेपर्यंत मॅसेज करण्याचा प्रकार चालविला. सदर विद्यार्थिनीने दाद न देता त्याचा फोन नंबर काळ्या यादीत टाकला. तरीही सदर शिक्षक इथेच थांबला नाही तर त्याने पीडित मुलीच्या मैत्रीणीला फोनवर मॅसेज टाकून तिच्यापर्यंत पोहचविण्याचा अट्टाहास धरला. हा प्रकार मैत्रिणीने आईवडिलांकडे सांगितल्याने घटनेचे बिंग फुटले. ही तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे गेली. मुलींच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून सामाजिककार्यकर्ते सहभागी झाल्याने प्रकरण पोलिसात गेले. पोलिसांनी घटनेची शहानिशा करून भारतीय न्याय संहिता नुसार पोक्सोची कारवाई केली. आरोपी मस्तरला अटक करून न्यायालयात पेश करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान दुसºयाच दिवशी आरोपीकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला. यात न्यायालयाने आरोपी शिक्षकाची जामीन मंजूर केली.
शाळा प्रशासनाचा कानाडोळा!
आॅगस्ट महिन्यात एका अज्ञात मुलीच्या पालकाने शिक्षकाविरोधात तक्रार केली होती याकडे शाळा प्रशासनाने पूर्णता कानाडोळा केल्याने त्या शिक्षकाची मॅसेज करण्याची हिंमत वाढली. परिणामी दहाव्या वगार्तील दोन विद्यार्थ्यांनीचा मानसिक छळ झाला. याला कारण एसएससी बोर्ड माज्या संबंधातील असल्याचा कांगावा करून विद्यार्थिनींना आपलेसे करण्याचा प्रयत्न झाला. यानिमित्ताने आॅगस्ट महिन्यातील प्रकरणातून शाळा संचालक मंडळाने प्रकरणातील आरोपी दिघोरीसह निलंबित केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समजली. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून शाळा प्रशासनाने सजग राहावे अशी मागणी पत्रकार परिषदेतून हरिश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी केली आहे.
अजूनही काही मासे गळाला लागणार!
आता तर एकच शिक्षक आरोपी म्हणून पुढे आला. परंतु याआधी अज्ञात मुलीच्या पालकाने आॅगस्ट महिन्यात एका शिक्षकाविरोधात मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती. मात्र याकडे शाळा प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले होते. सदर प्रकरण सामाजिक कार्यकर्ते हरीश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांच्या प्रयत्नाने उघडकीस आल्याने एका मागून एक प्रकरणे पुढे येत आहेत. सदर शाळेमध्ये यापूर्वी अनेक प्रकरणे घडले असल्याची शंका सर्रास व्यक्त केली जात आहे. निर्माण प्रकरणाची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून वैनगंगा विद्यालयातील समाजमन हादरवणारा रॉकेट उघडकीस आल्यास आणखी काही मासे गडाला लागणार अशी शहर वासीयांमध्ये जोरदार चर्चा आहे. असे असले तरी पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाने कुणालाही पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई करून लागलेली कीड समूळ नष्ट करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत हरीश तलमले, मयूर रेवतकर व मनोहर मेश्राम इत्यादींनी केली आहे.