तिरोडा : गोंदिया वरून तुमसरकडे जाणारे एसटी बसला गंगाझरी दांडेगाव दरम्यान रस्त्याचे सुरू असलेले कामामुळे समोरून येणारे दुचाकी स्वारास वाचवण्याचे प्रयत्नात मुरमाचे ढीगावर चढल्याने तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चालक वाहक व इतर प्रवासी सुखरूप आहे . आज दिनांक ८ रोजी दुपारी ३.१५ दरम्यान तुमसर आगाराची एस.टी. बस क्रमांक एम एच ४० वाय ५४९३ गोंदिया वरून तिरोडा मार्गे तुमसर कडे जात असताना गंगाझरी दांडेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे बांधकामामुळे एकेरी वाहतूक सुरू असताना समोरून येणारे दुचाकीस्वारास वाचवण्याचे प्रयत्नात बस रस्त्याचे कडेला उतरून मुरमाचे ढिगाºयावर चढून अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात बस चालक नितेश सरोदे, वाहक नेहा मलेवार यांचे सह बस मधील ५८ प्रवासी सुखरूप असून तिरोडा येथील स्वाती बारबैले व वडेगाव येथील साक्षी उगदे, रामदास ढोकळे हे किरकोळ जखमी झाले असून स्वाती बारबैले तिरोडा आगारा तर्फे पाचशे रुपयाची तातडीची मदत देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच तिरोडा आगाराच्या आगार व्यवस्थापक संजना पटले आपले कर्मचाºयासह अपघात स्थळी पोहोचून जखमींची विचारपूस करून पुढील कारवाई करीत आहेत.