भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रायपूर ते नागपूर महामार्ग क्र. ५३ नैनपूर कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रकमधील डिझेज जबरीने चोरी करणाºया आंतरराज्यीय टोळीतील दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातून अटक केली. हिमांशू उर्फ पुट्टू राजकुमार विश्वकर्मा (१९, रा.नैनपूर मंडला) व सलमान बशीर खान (२७, रा.मंडला) अशी चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २ चारचाकी वाहनासह ५६.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी ट्रकचालक प्रदिप मोतीलाल यादव (३६, रा.महाराज गंज जि.आजमगड, उत्तरप्रदेश) हा ट्रक क्र. एमएच ४०, एके २५५७ ने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून आयरन माती घेऊन रायपूरकडे जात होता. २४ सप्टेंबर रोजी रात्री १.४० वाजता राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नैनपूर कोहमारा येथे एका पेट्रोलपंपाजवळ थांबला असता चार अज्ञात आरोपी पांढºया वाहनातून ट्रकजवळ आले व १६ हजार १०० रुपयांचा १७५ लीटर डिझेल जबरीने चोरुन नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी डुग्गीपार पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना फिर्यादी ट्रकचालकाने अज्ञात आरोपींचे केलेले वर्णन, गुन्हा करण्याची पद्धत आदी माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन्ही आरोपींना मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील नैनपूर येथून अटक केली. दोघांनीही त्यांच्या इतर पाच साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींना डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल आहे.