जबरी पैसे लुटणारे दोघे अट्टल गुन्हेगार गजाआड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रस्त्याने जाणाºया नागरिकांना थांबवून शस्त्राचा धाक दाखवून जबरी पैसे चोरणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना शहर डीबी पथकाने अटक केली. घनशाम ऊर्फ गोलू अशोक चौधरी (२०, श्रीनगर गोंदिया) व मित्तल मुनेश्वर तुपटे (१८ वर्षे रा. पैकनटोली गोंदिया) अशी आरोपींची नाव आहे. फिर्यादी गोपाल त्रिलोकचंद शर्मा (२६, रा. श्रीनगर) हे २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास सावित्रीबाई फुले मार्गे ढाकणी जाणाºया रोडवर फिरत असतानी आरोपी गोलू चौधरी व मित्तल तुपटे यांनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवू दगडाने छातीवर, नाकावर मारुन जखमी केले व त्यांच्या पँटच्या खिशातून १४१० रुपये जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या डीबी पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला दगड व चाकू जप्त करण्यात आला आहे. तर चोरी केलेली रक्कम खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *