भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा समान्य रुग्णालयातील आॅर्थोपेडीक विभागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने मध्ये सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या कालावधी मध्ये तत्कालीन अधिकाºयांनी आपल्या पदाचा दुपयोग करीत आॅर्थोपेडीक विभागात खरेदी करतेवेळी आॅनलाईन टेंडर न करता लिफाफा पध्दतीने प्रकीया राबवून हवे असलेल्या ठेकेदारालाच हा टेंडर मिळावा या करीता सर्वतोपरी प्रयत्न केला. यामुळे संगमत करून सरकारच्या करोडो रूपयाचा केल्याची तक्रार राष्टÑवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अजय गोपीचंद मेश्राम यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांनी दिनांक १५/०३/२०२४ ला दिली होती. यासंबंधी एक तक्रार पुन्हा पालकमंत्री यांना देखील पुराव्यानिशी दिली होती पंरतु ना पालकमंत्री मोहदयांनी यांची गंभिरता कळली नाही, त्यांनी त्या तक्रारीकडे साधे लक्ष सुद्धा दिले नाही. त्यामुळे या घोटाळयाचे तार नेत्यांपर्यंत असल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी यांनी सामान्य रुग्णालयातील खरेदी करते वेळेस एका वस्तुची किमंत आजच्या किंमती पेक्षा आठ पटीने वाढवून आॅर्थोपेडीक विभागातील खरेदी केल्या असल्याने तत्कालीन टेंडर प्रक्रीया मध्ये सहभागी असलेल्या अधिकाºयाने शासनाला मोठ्या प्रमाणात चुना लावण्याचा गोरखधंधा केल्याचे आता जिल्हाधिकारी यांच्या तपास अहवालात पुढे आले आहेत. यात शासकीय यंत्रणे मध्ये खरेदी करते वेळी मान्यता प्राप्त वृत्तपत्रामध्ये त्या संबंधी टेंडर जाहिरात प्रकाशित करुन टेंडर मागविण्यात येत असतात. परंतु सामान्य रुग्णालयात या प्रक्रीयेचा कुठेही वापर करण्यात आला नाही. या खरेदी घोटाळयामुळे शासनाला करोडो रुपयाचा अपहार झाल्याचा कागद पत्रावरुन दिसून येत असल्याने या आॅर्थोपेडीक विभागातील झालेल्या घोटाळयाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार केली होती.
मात्र आज ८ महिने लोटून देखील भ्रष्टाचारी अधिकाºयावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने या अधिकाºयावर वरीष्ठ अधिकाºयांचा आर्शिवाद असून यामध्ये आणखी मोठे अधिकारी सहभागी असल्याची आरोप करीत सदर दोषी अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच खरेदीमध्ये सहभागी असलेल्या कंपनीला काळया यादी मध्ये टाकून त्यांच्या कडून अपहार केलेली रक्कम सरकार जमा करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. तसेच याबाबत महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अपहार केल्याचा पुरावा व अहवाल हे सोबत कागदपत्र जोळण्यात आलेले आहेत. घोटाळा करण्याºया अधिकाºयावर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंंबीत करण्यात यावे. व या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा आठ दिवसानंतर राष्टÑवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अजय गोपीचंद मेश्राम जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रपरिषदेत देण्यात आला.