भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी / भंडारा प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा ७ आॅक्टोंबर २०२४ रोजी प्रकल्प कार्यालय सभागृह, देवरी येथे पार पडली. ही सभा तीन तास चालली.
दोन्ही प्रकल्पातील शिक्षक – कर्मचाºयांची प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी निर्देश प्रकल्प अधिकाºयांना दिले. सभेत देवरी / भंडारा प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा मुख्याध्यापकांची बैठक घेऊन वेतन देयके २० तारखेच्या आत सादर करण्याबाबत सूचना द्या आणि वेतनाबाबत दिरंगाई करू नका, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाºयांना दिल्या. सोबतच सेवानिवृत्त / मयत कर्मचाºयांची पेन्शन केस व इतर आर्थिक लाभाची प्रकरणे, जीपीएफ व डीसीपीएसच्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाºयांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय देयके, थकीत देयके, कार्यरत कर्मचाºयांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाºयांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाºयांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाºयांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे तसेच इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाºयांना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.
देवरी प्रकल्पातील बरीच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. सभेला देवरी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, भंडारा प्रकल्प अधिकारी नीरज मोरे व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धूर्वे, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, रतन वासनिक, सूर्यकांत केंद्रे, आदिवासी आश्रमशाळा संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, कटरे सर, प्राचार्य धनराज हुकरे, राजेश सलामे, महेंद्र मेश्राम, प्राचार्य जी. एम. मेश्राम व मोठ्या संख्येने आश्रमशाळा समस्याग्रस्त शिक्षक – कर्मचारी उपस्थित होते.