भंडारा/पत्रिका भंडारा : वर्तमान स्थितीत रेतीचे वाधारलेली दरे कमी करून घरकुल धारकांना कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे एक निवेदन जिल्हा शिवसेने मार्फत देण्यात आले. हे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधणे यांनी दिले. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हंटले गेले आहे की, भंडारा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात घरकुल योजनेची घरे मंजूर करण्यात आली आहे. या घरकुल योजनेची कामे सुरू असतांना रेती कहा तुटवडा सुरू झाला आहे आणि शासन द्वारे सुरू करण्यात आलेल्या रेती डेपो वर ही नियोजित दर पेक्षा अधिक दरे घेण्यात येत आहे. ज्या मुळे गरिबांना मिळणाºया घरकुलांची कामे रडखडली गेली आहे. तरी जिल्ह्यात रेतीची वधारलेली दरे कमी करून घरकुल योजनेच्या लाभार्थी ला रेती उपलब्ध करून देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.