भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्या सुरू असलेला नवरात्र उत्सव व आगामी दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरीता भंडारा पोलीस दलातर्पेष्ठ दि.७ आॅक्टोंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण जिल्ह्यात आॅल आऊट,कोंबिग आॅपरेश मोहीम राबविण्यात आली. सुरू असलेले नवरात्र तसेच आगामी दसरा, दिवाळी उत्सव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
या उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र निर्माण होवू नये याकरिता पूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरीता जिल्ह्यात आॅल आऊट,कोबींग आॅपरेषन व नाकाबंदी मोहीम यशस्वी राबविण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील आॅल आऊट, कोम्बिंग आॅपरेशन/ नाकाबंदी दरम्यान ५५ अधिकारी व ४११ अंमलदार व ७९ होमगार्ड उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारुबंदी कायदा अन्वये २९ कार्यवाही, एनडीपीएस अन्वये १ कारवाई, जुगार ३ कार्यवाही, रेती चोरी – ३ कार्यवाही, मोटार वाहन कायदा अन्वये ५१६ केसेंस,ड्रींक अॅन्ड ड्राईव्ह अन्वये .०८ कार्यवाही करण्यात आल्या तसेच कारागृहातुन सुटलेले गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार, माहितीगार गुन्हेगार अशा एकूण २१२ आरोपींची त्यांच्या घरी असल्याबाबतची तपासणी करण्यात आली. या आॅपरेशनदरम्यान एकुण ९२६ वाहनांची तपासणी करण्यात आली.
“जिल्ह्यातुन अवैध धंद्याचा, अमली पदाथार्चा समुळ नायनाट करण्याकरीता जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांच्या परिसरात सुरू असलेले अवैध धंदे, अंमली पदार्थ सेवन करणारे, बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरुध्द भंडारा जिल्हा पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल .”
नूरुल हसन पोलीस अधिक्षक भंडारा