भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नाने प्राचीन खांबतलाव येथे साकार झालेल्या ५१ फूट उंच भगवान श्रीराम मूर्तीचे भव्य अनावरण गुरुवारी, दिनांक १० आॅक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता संपन्न होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगाला साक्षी म्हणून संत महंत तसेच पंचक्रोशीतील मंदिर व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व वैदिक मंत्रोच्चाराच्या विधीमध्ये हा पवित्र सोहळा संपन्न होईल. या विशेष प्रसंगी प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांचीभजन संध्या आयोजित केली आहे. त्यांच्या सुमधुर आवाजात भक्तिरसात न्हाऊन जाण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
नागरिकांची प्रतिक्रिया
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे भंडारा शहराचे नाव राज्यभरात उजळणार असून, हे एक श्रद्धास्थळ आणि पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.
विदर्भातील प्रमुख आकर्षण बनेल – आमदार नरेंद्र भोंडेकर
विदर्भातील हा प्रकल्प केवळ धार्मिक महत्वासाठीच नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. ५१ फूट उंचीची भगवान श्रीराम मूर्ती हे विदर्भातील प्रमुख आकर्षण बनेल, ज्यामुळे पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी भंडाºयातील खांबतलाव येथे ओढली जाईल.