भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील पाथरी (चिचाळ) ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया पाथरी (टोला) येथील क्रिडांगणासाठी राखीव असलेल्या गट क्र.५५३ या शासकीय जागेवर गावातीलच प्रभाकर नागपूरे यांनी बळजबरीने अवैधरित्या अतिक्रमण करून घराचे पक्के बांधकाम केले. त्यामुळे येथे विविध प्रकारचे खेळ खेळणाºया गावातील खेळाडुंना व गावातील तसेच परिसरातील पोलीस भरतीचा सराव करणाºया युवक-युवतींना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागपूरे यांनी केलेले पक्के अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी खेळाडु, पोलीस भरतीचा सराव करणारे युवक-युवती तसेच गावकºयांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे केली आहे. सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व कारवाई पुर्ण करण्यात आली असुन येत्या १४ आॅक्टोंबर रोजी नागपूरे यांचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. ग्राम पंचायत पाथरी (चिचाळ) येथील पाथरी टोला येथील गट क्र.५५३ असलेली ३.६९ हेआर ही जागा ग्राम पंचायतीने क्रिडांगणाकरीता राखीव केली आहे.
या ठिकाणी अनेकदा केंद्रस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धांचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. तसेच गावातील मुले-मुली व शालेय विद्यार्थी सुध्दा या जागेवर विविध प्रकारचे खेळ खेळत असतात. यासह गावातील व परिसरातील तरूण-तरूणी हे येथे पोलीस भरतीचा सराव करण्याकरीता नियमित येत असतात. त्यामुळे हि जागा क्रिडांगण म्हणुन ओळखली जाते. काही महिन्याअगोदर या जागेच्या मधोमध गावातीलच प्रभाकर नागपूरे यांनी या क्रिडांगणाच्या जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करून घराचे बांधकाम करण्यास सुरूवात केली. सदर बाब येथे खेळण्याकरीता तसेच पोलीस भरतीचा सराव करण्याकरीता येणाºया तरूणांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती ग्राम पंचायतीला दिली. तसेच होणाºया अतिक्रमणामुळे येथे खेळाडुंना तसेच पोलीस भरतीचा सराव करणाºया तरूणांना मोठया प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे सांगत सदर बांधकाम थांबविण्याची मागणी ग्राम पंचायत प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानुसार ग्राम पंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारक प्रभाकर नागपूरे यांना क्रिडांगणाच्या जागेवर अतिक्रमण न करण्यासंदर्भात तोंडी विनंती केली मात्र प्रभाकर नागपूरे यांनी ग्राम पंचायतीच्या त्या विनंतीला धुडकावुन लावीत त्यांचे बांधकाम सुरूच ठेवले. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारक प्रभाकर नागपूरे यांना दि.११ जुन २०२४ ला पहिले व १८ जुलै रोजी दुसरे तर २९ जुलै रोजी तिसरे पत्र देवुन सदर ठिकाणी बांधकाम न करण्याच्या व केलेले बांधकाम काढण्याच्या सुचना केल्या.
मात्र प्रभाकर नागपूरे यांनी त्या तिन्ही पत्राकडे दुर्लक्ष करीत आपल्यामनमजीर्नुसार घराचे बांधकाम सुरूच ठेवले. अखेर ग्राम पंचायत प्रशासनाने या प्रकरणी पवनी तहसीलदार यांना निवेदनाद्ववारे सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन व कारवाई करण्याची विनंती केली असता तहसीलदार पवनी यांनी याप्रकरणाची सुनावणी घेवुन योग्य कारवाई करण्याचे तसेच प्रथम दर्शनी सदर अतिक्रमण हे अवैधरित्या असल्याचे दिसुन येत असुन सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात येत्या आठ दिवसात कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन ग्राम पंचायत प्रशासनाला दिले. तहसीलदार पवनी यांच्याकडे याप्रकरणी तीन वेळा सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या सुनावणीला अतिक्रमणधारक प्रभाकर नागपूरे हे सदर जागेवर त्यांचे मालकीहक्काबाबतचे कोणतेही पुरावे सादर करून न शकल्याने तहसीलदार पवनी यांनी सदर अतिक्रमण अवैध असुन ते स्वत: काढण्याच्या तोंडी सुचना प्रभाकर नागपूरे यांना दिल्या. मात्र नागपूरे यांनी तहसीलदार यांच्या त्या सुचनांचे पालन न करता त्याकडे कानाडोळा केला.
दरम्यान तहसीलदार पवनी यांच्याकडे झालेल्या दुसºया सुनावणीला दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी तहसीलदार पवनी यांनी अतिक्रमण धारकाला घराचे बांधकाम थांबविण्याच्या तोंडी सुचना केल्या. मात्र तरीसुध्दा नागपूरे यांनी त्यांच्या घराचे बांधकाम सुरूच ठेवले. दरम्यान सदर प्रकरणी ग्राम पंचायत प्रशासनाने तहसीलदार यांच्याकडे सर्व कागदपत्रांच्या पुराव्यानिशी पाठपुरावा केल्याने दि. २४ सप्टें २०२४ रोजी तहसीलदार यांनी ग्राम पंचायत प्रशासनाच्या नावे एक आदेशवजा पत्र काढुन प्रभाकर नागपूरे यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण हे अवैध असल्याचा निवार्ळा देत सदर अतिक्रमण हे सहा महिन्यापुवीर्चे असल्याने ते अतिक्रमण काढण्याचे अधिकार हे ग्राम पंचायत प्रशासनाला असल्याचे सांगत ग्राम पंचायत प्रशासनाने स्वत:च्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मात्र सदर जागा हि शासकीय असुन सदर जागेचे सिमांकननसल्याने भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सिमाकन करण्याचेही आदेशात म्हटले आहे.