भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा येथे आज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सिहोरा पोलिसांच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. तुमसरचे (अतिरिक्त कार्यभार) पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात काढण्यात आले. मा दुर्गा, शारदा व दसरा सण या सार्वजनिक उत्सवाचे अवचित्य साधून आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडावे कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, सुव्यवस्थेचा प्रश्न ढासळणार नाही असे आव्हान सुद्धा या रूट मार्च दरम्यान करण्यात आले. सदर रूट मार्च सिहोरा मार्केट, मज्जिद मदरसा रोड, दुर्गा मंदिर व बस स्थानक मार्गे करण्यात आला असून पीए सिस्टीम द्वारे नागरिकांनी शांतता राखावी असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन सिहोराचे ३ अधिकारी,१२ अमलदार २० सैनिक व आरसी पी प्लाटून क्रमांक १ व २ उपस्थित होते.