भंडारा : भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याºया मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स चे बलराम गर्ग, सुक्षम गर्ग, उमेश गोगीया, निरज अडवाणी, दर्शन , श्री. मिश्रा , हितेंद्र कपाडीया, श्री. डागा, श्री. राठोड, जयंत वैरागडे, एड. विनयमोहन पशिने, पंकज सारडा,नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.