रेल्वे विभागाचे काम बंद करण्याचे आश्वासनाअंती आंदोलन स्थगीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा खैरलांजी मार्ग व तिरोडा कवलेवाडा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून खैरलांजी मार्गावरील वाहतूक तिरोडा चिरेखनी मार्गाने वळवण्यात आल्याने या मार्गावरून २४ तास भरधाव रेतीचे टिपर धावत असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून वाहनांमुळे अपघाताचे भितीने व उडणारे धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने चिरेखनि वासी व तिरोडा येथील संत सज्जन वार्डातील नागरिकांनी आज पासून आंदोलनाचा इशारा दिल्याने उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात समन्वय सभा घेण्यात येऊन यात रेल्वे विभागाचे काम बंद करण्यात येऊन रस्त्यावर दिवसा तीनदा पाणी मारण्याचे तसेच रस्त्या करता निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्त करण्याचे ठरवण्यात आल्याने नागरिकांनी आपले आंदोलन स्थगित केले.

आज दिनांक १५ आॅक्टोंबर रोजी तिरोडा शहरातील संत सज्जन वाढ व चिरेखनिवासी यांनी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून सतत अपघाताची भीती असून भरधाव वेगाने धावणारे पेपर मुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे पिण्याचे पाण्यात व जीवनात तसेच नाकातोंडात जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे आज दिनांक १५ पासून आंदोलन करण्याचा इशा- रा दिल्यावरून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी आपले कार्यालयात आमदार विजयकुमार रहागंडाले यांचे उपस्थितीत रेल्वे कंत्राटदार अधिकारी तहसीलदार नारायण ठाकरे नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल परिहार ठाणेदार अमित वानखडे व नागरिकांचे उपस्थितीत समन्वय सभा आयोजित करण्यात आली

या सभेत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्याने उपविभागीय अधिकारी यांनी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकाºयांशी मोबाईलवर चर्चा करून आता निवडणुक आचार संहिता लागली असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांच्या समस्या मांडल्या असता त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा असे सांगितले असता रेल्वे अधिकाºयांनी सध्या नीधी उपलब्ध नसल्याने रस्ता दुरुस्त करता येणे शक्य नसल्याने रेल्वे विभागाचे काम थांबवण्यात यावे व लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रसत्याचे काम करावे असा निर्णय तसेच या रस्त्यावर दररोज दिवसभर पाणी मारणार असल्याचे त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात या मागार्ने होणारी रेतीचे टिपटची वाहतूक बंद करण्याचा निर्णय या सभेत सवार्नुमते घेण्यात आल्याने नागरिकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. अशा संदर्भाचे पत्र उपविभागीय अधिकारी यांनी व्यवस्थापकांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *