बोगस क्रेडिट कार्डद्वारे ६.२८ लाखांनी फसवणूक

गोंदिया : तरुणाच्या आधार व पॅन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून, तसेच दुसºया तरुणाच्या क्रेडिट कार्डच्या आधारे सहा लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथे घडलेल्या या प्रकारात आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी त्या आरोपींसह या कामात सहभागी असलेल्या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान घडलेल्या या प्रकारात सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सागर भागवत बागडे (२७) या तरुणाचा मोबाइल व ईमेल आयडी हॅक करून त्याचे उत्पन्न जास्त दाखवून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी सहा लाख २६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्यारकमेतून आरोपींनी सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले. आमगाव पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास करून आमगाव न्यायालयाच्या आदेशावरून १३ आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४२३, ४६४,४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *