भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भोसा/टाकळी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई करीत ४ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. एसडीपीओ भंडारा चे पथक गस्तीवर असतांना दि.१५ आॅक्टोंबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भोसा/टाकळी परिसरात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारा विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आढळुन आला.
पथकाने सदर ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा केला असता ट्रॅक्टर चालक दामोदर सेवकराम ईश्वरकर वय ३४ वर्षे रा.टाकळी/ भोसा ता.मोहाडी जि.भंडारा हा ट्रॅक्टरसोडुन पळुन गेला. घटनास्थळावर ट्रॅक्टर मालक अनिकेत रोशन ऊके वय २९ वर्ष रा. टाकळी/भोसा याचे ताब्यातुन अवैधरित्या ट्रॉलीमध्ये १ ब्रास चोरीची रेती किंमत ६ हजार रू. व ट्रॉली सहट्रॅक्टर असा एकुण मिळुन ४ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी पो.स्टे. वरठी येथे अप.क्र.२१७/२४ कलम ३०३(२), ४९ बीएनएस सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (गौण खनिज) सहकलम ७,९ पर्यावरण संरक्षण अधिनियम सहा कलम ३(१)/ १८१, १३९/१७७, १३० मोवाका प्रमाणे दोन्ही चालक-मालक आरोपी विरुद्ध पोस्टे वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे