श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमोचा गोंधळ आणि घोषणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बुधवारी नागपूर येथे प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान व्याख्यानस्थळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आला होता. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६ वाजता प्रा. शाम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘संविधान बचाओ-महाराष्ट्र बचावो’ हा श्याम मानव यांच्या व्याख्यानाचा विषय होता. सध्याची राजकीय स्थिती, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील बेरोजगारी, उद्योग गुजरातला जाणे, संविधानाचे रक्षण करण्यासाठ उपाय, महाराष्ट्रातील पोलिसांची अवस्था, आरक्षणाचे काय होणार इत्याती विषयांवर श्याम मानव आपली भूमिका या व्याख्यानात मांडणार होते. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होता. मात्र त्यापर्वीच श्रोत्यांची गर्दी सभागृहात होऊ लागली होती. या श्रेत्यांमध्येच भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्याख्यान सुरू झाल्यानंतर श्रोत्यांमध्ये बसलेल्या भाजयुमोच्या कार्यकत्यार्ने श्याम मानव यांना संविधानाच्या संदर्भात प्रश्न विचारला. २०१४ नंतर आतापर्यंत किती वेळा संविधानात बदल करण्यात आला, असे त्यांना विचारले. मात्र श्याम मानव यांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

भाजयुमोचे कार्यकर्ते व्यासपीठीवर जाऊन घोषणा देत होते. त्यावेळी श्याम मानव त्यांच्या खुर्चीवर शांतपणे बसून होते.यासंदर्भात श्याम मानव म्हणाले. अशा प्रकारच्या गोंधळाची मला सवय आहे, त्यामुळे मी विचलीत झालो नाही. माझे भाषण पूर्ण मी करणारच आहे. गोंधळाला मी भिक घालत नाही.. दरम्यान भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष शिवाणी दाणी यांनी श्याम मानव यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. त्या म्हणाल्या आम्ही फक्त श्याम मानव यांना एक प्रश्न विचारला. २०१४ नंतर आतापर्यंत किती वेळा संविधानात बदल करण्यात आला हे त्यांनी सांगावे, पण ते काहीच सांगत नव्हते. हे काँग्रेसचे दलाल आहेत. त्यांच्याच पैशावर असे कार्यक्रम घेतात. अंधश्रद्धा निर्मूलन वैगैरे काही होत नाही. हा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नाहीच, असे शिवाणी दाणी म्हणाल्या. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा त्यांनी साफ इन्कार केला. फक्त प्रश्न विचारला, त्यांनी त्याला उत्तर देणे अपेक्षित होते. दरम्यान यापूर्वीही अंधश्रद्दा निर्मूलन समितीतर्फे आयोजित अशाच प्रकारच्या कार्यक्रमात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पूवीही श्याम मानव यांचे कार्यक्रम नागपुरात झाले होते. त्यात त्यांनी महायुती सरकारवर टीका केली होती

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *