भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधनात्मक मागार्ने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या आदेशान्वये बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे तुमसर तालुका अध्यक्ष काशिराम ठाकरे सचिव राजेश बावणे यांनी निवेदन सादर करुन मागणी केली की तुमसर तालुक्यातील मौजे पंगडी, अंबापुर , आलेसूर, रामपूर हमेशा, मोहगाव विटपुर सहीत इतरही गावात आदिवासी वन जमीन धारकांना वन विभागांकडून मालकी हक्काबाबत चे प्रमाण पत्र वितरित केले आहे परंतु त्यांच्या नावाची नोंद सातबारा अभिलेखात घेणे अपेक्षित होते परंतु त्या नोंदी झालेल्या नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डा सुखदेव कांबळे यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की अनुसूचित जमाती व ईतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम २००६ व त्या अंतर्गत निर्गमित झालेले नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ वन हक्क दाव्याची मोजणी व सातबारा उतारा वाटप करणे बाबत शासन परिपत्रक क्रमांक एस -१०/ २०११/ प्र, क्रं ृ७६ / फ/8/दिनांक २ जानेवारी २०१ नुसार सातबारा मध्ये नोंदी घेणे अपेक्षित असताना नोंदी घेण्याबाबत कारवाई झालेली नाही म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कडे मागणी केली असल्याची महिती तुमसर तालुका अध्यक्ष काशिराम ठाकरे सचिव राजेश बावणे महिला अध्यक्षा श्रीमती वैशाली सूरपाम यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले असुन तुमसर तालुक्यासहीत विटपूर येथील बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सेवकराम नेटीउपस्थित होतें