भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात अवघ्या १० रुपयांच्या वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही हृदयद्रावक घटना सालेकसा तालुक्यातील बाबाटोली गावात मंगळवार, १५ आॅक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली. माहिती देताना पोलीस सूत्र- ांनी सांगितले की, अरबाज अहमद साह असे मृताचे नाव आहे. हत्येचा आरोप असलेल्या तरुणाचे नाव अलिफ आहे. हत्येची घटना घडली त्यावेळी अलिफ त्याच्या शेजाºयांसोबत अरबाज अहमद साहच्याघरासमोरील रस्त्यावर पत्त्यांचा जुगार खेळत होता. दरम्यान, जुगार फंडातील रक्कम १० रुपयांनी कमी झाली. अशा स्थितीत त्यांनी तेथे बसलेल्या मृताची तक्रारदार पत्नी तनिसा हिच्यावर पैसे हरवल्याचा आरोप केला आणि तिच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेण्यास सुरुवात केली. हे पाहून अरबाज साह पत्नी तनिसा हिच्या मदतीला धावून आला. या प्रकरणावरून अलिफ आणि अरबाजमध्ये जोरदार भांडण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध कलम १०३ (१), ३५२ भारतीय न्याय संहिता २३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
भांडणाच्या वेळी रागाच्या भरात अरबाजने अलिफच्या मानेवर वस्तूने वार केले ज्यामुळे त्याला रक्तस्त्राव होऊ लागला. अलिफची पत्नी तिथे आली आणि पतीला शांत करून घरी घेऊन गेली. मात्र, अलिफ पुन्हा तेथे आला आणि त्याने अरबाज साहसोबत शिवीगाळ आणि भांडण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अलिफने सोबत आणलेल्या मोठ्या धारदार लोखंडी कात्रीने अरबाजच्या छातीवर आणि पोटावर वार केले. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना घरातून सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.