शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक २०२४ ची दिनांक १५ आॅक्टोबर २०२४ रोजी घोषणा केली असून घोषणेच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी फौजदारी प्रकि-्रया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम अधिकाºयांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी ६ वाजेपूर्वी आणि रात्री. १० वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश जिल्ह्यासाठी २५ नोंव्हेंबर २०२४ रोजीपर्यत अंमलात राहील.

विश्रामगृह वापरावर निर्बंध

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध निवडणूकीचे कालावधीतजिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे याठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे,इत्यादी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आले. हे आदेश जिल्ह्यासाठी २५ नोंव्हेंबर २०२४ पर्यत अंमलात राहतील.

मालमत्तेची विदृपता नको

शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची विरुपता करण्यास निर्बंध निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हा आदेशजिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून २५.११.२०२४ पर्यत अंमलात राहील.

शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर व शस्त्र बाळगण्यास बंदी

निवडणूकीचे कालावधीत शास्- ाकीय कर्तव्य पार पाडणाºया व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक २० सप्टेंबर २०१४ च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारके व्यतिरिक्त इतर सर्व परवाना धारकास परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश निर्गमित झाल्यापासून २५.११.२०२४ पर्यत अंमलात राहतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *