भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या मंदिराच्या समोरील तीर्थक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर यावर्षी प्रथमच भव्य भजन स्पर्धेत ३२२ मंडळांनी नोंदणी केली होती. राष्ट्रपिता महात्मागांधी जयंती व नवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य भजन स्पर्धा आयोजित प्रथमच सुरवात करण्यात आली.भजन स्पर्धेचे स्वरुप, स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांची भजन स्पर्धा दि.२ ते १४ आॅक्टोबर २०२४ ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात आली. भजन स्पर्धा जिला परिषद क्षेत्र, नगरपंचायत क्षेत्र, नगर परिषद क्षेत्रानुसार घेण्यात येईल. स्पर्धेत सहभागी मोहाडी व तुमसर तालुक्यातील स्पर्धकामधुन जिल्हा परीषद क्षेत्र निहाय प्रत्येकी १ नगर पंचायत मोहाडी १, नगरपरिषद तुमसर ३ अश्याप्रकारे २१ उत्कृष्ठ भजन मंडळांची सेमी फायनल भजन स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. सेमी फायनल भजन स्पर्धेतुन ११ मंडळाची फायनल स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. सेमी फायनल भजन स्पर्धा सोमवार दि.१३ आॅक्टोबर २०२४ ला घेण्यात. फायनल भजन स्पर्धा सोमवार दि.१४ आॅक्टोबर २०२४ ला घेण्यात आली. समाज प्रबोधन व थोर संताचे विचार जनमाणसांत पोहचविण्याकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व नवरात्रीच्या पावन पर्वावर मोहाडी व तुमसर तालुक्यातील सर्व भजन मंडळांना निमंत्रीत करण्यात आले होते.
दि.२ ते १४ आॅक्टोबर २०२४ पर्यंत श्रध्दामय व मंगलमय वातावरणांत सुप्रसिद्ध जागृत माता चौण्डेश्वरी देवी मंदिर परिसरात भव्य भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. भव्य भजन स्पर्धा प्रथम बक्षीस ५१ हजार १११ रुपये एकता भजन मंडळ चिखलीचे कु.रुची दामोदर मेहर प्रमुख भजन गायक, हर्मोनियम वादक, दामोदर महादेव मेहर तबला वादक, संगीत विशारद, सात्विक दामोदर मेहर टाळ वादक, रत्नकला दामोदर मेहर कोरस, सुलोचना मनोहर मेहर कोरस, राजेश दामोदर समरीत कोरस, राधेशाम साधू बागडे कोरस, चैतराम इसºया बागडे कोरस, तुकाराम धुर्वे खंजेरी वादक, अमन परसराम क्षीरसागर टाळ वादक यांनी पटकाविला. दुसरे बक्षीस ४१ हजार १११ साईराम भजन मंडळ परसवाडा, तृतीय बक्षीस ३१हजार १११ परमात्मा एक भजन मंडळ धोप, चतुर्थ बक्षीस २१ हजार १११ जय माँ भवानी मंडळ मलिदा, पाचवे बक्षीस ११ हजार १११ रुपये पौराणिक भजन मंडळ आष्टी यांना देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व भजन मंडळांना २ हजार १११ रुपये उत्तेजनार्थ पुरस्कार, सम्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
सेमी फायनल स्पर्धेत सहभागी २१ भजन मंडळाना प्रत्येकी ३१११ रु, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. फायनल स्पर्धेत ५ पुरस्कार प्राप्त मंडळानंतर उरलेल्या ६ मंडळांना प्रत्येकी ५१११ रु उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. भजन मंडळात कमीत कमी ९ व जास्तीत जास्त ११ सदस्यांचा समावेश करण्यात आले होते. भजन मंडळांना समाज प्रबोधन, देवीगीत व इतर १ असे ३ भजन मंडळांना २० मिनिटे देण्यात आले होते. भजन स्पर्धा सकाळी ९ वाजेपासुन तर रात्री ३ वाजेपर्यंत सुरु होते. यावेळी ज्योती चेतराम वाघाये लाखोरी, कोयल रोशन कांबळे शंकरपूर, कविता कार्तिकस्वामी मंगाम अजीमाबाद, कार्तिक स्वामी महादेव मेश्राम अजीमाबाद, अतुल कानतोडे झबाडा, वनिता मोहन बारस्कर तुमसर, रेखा सुनील पटले भंडारा यांनी उत्कृष्ट परीक्षण केल्याबद्दल आमदार राजू माणिकराव कारेमोरे व रंजिता राजू कारेमोरे यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपये रोख देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन चव्हाण, मनोहर हेडाऊ, सचिन गायधने, यशवंत बावणे, जगदीश शेंडे धोप, अरुण तीतरमारे मलिदा, राकेश सुधाकर थोटे, लहानू रामरतन फुलेकर सिरसोली यांनी परिश्रम केले. सहभागी भजन स्पर्धेकाला लाल दुप्पटा, श्रीफळ, टिफिनडबा, चिवडा, सोनपापळी, मिठाई, गडीसाखर, घुंगरू, जेवण, चहा, बिस्किटे, प्रत्येकी रोख २ हजार १११ रुपयेप्रमाणे ३२२ सहभागी मंडळाला ६ लाख ७९ हजार ७४२ रुपये देण्यात आले.