भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया महिला अभ्यांगत, तसेच महिला अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी इतर उपस्थित अधिकाºयांसोबत कक्षाची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगनंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे व महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसºया माळ्यावर उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, मुलांना व मातेला स्तनपान करण्यासाठी व आराम करण्यासाठी सोफा, पलंग, पेंटींग, सिलींग, मॅटींग, खेळणी, खुर्च्या, लहान डायनिंग टेबल इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिशय सुविधापूर्ण हिरकणी कक्ष तयार केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. हिरकणी कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.