अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले डॉ. अतुल टेंभुर्णे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आजच्या आधुनिक युगात जिथे माणुस माणसापासुन दुरावत चालला आहे.जिथे स्वार्थाशिवाय माणुस समोरच्याशी बोलण्यासही विचार करतो तिथे काही माणसे देवदुतासारखे अचानक प्रकट होवुन मदतीचा हात पुढे करतांना दिसुन येतात.आणि याच कृत्यामधुन आजही माणुसकी जिवंत असल्याचे जाणवते. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अतुल टेंभुर्णे. डॉ.टेंभुर्णे यांनी वेळेच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज सायंकाळच्या सुमारास डॉ.अतुल टेंभुर्णे हे त्यांचे काम आटोपुन नागपूर इथुन परत भंडारकडे येत असतांना भंडारा तालुक्यातील ग्राम मुजबी परिसरात राष्टÑीय महामार्गालगत मोटारसायकलवरील दोघे जण बेशुध्द अवस्थेत पडुन असल्याचे डॉ.टेंभुर्णे यांना आढळले. कदाचीत एखाद्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेही जखमी होवुन बेशुध्द झाले असावेत.डॉ.टेंभुर्णे यांनी क्षणाचाही विलंब न करता तिथे उपस्थित नागरीकांच्या मदतीने त्या दोन्ही जखमींना उचलुन स्वत:च्या चारचाकी वाहनामध्ये भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय येथे आणुन त्यांना उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले.तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असुन जखमींना वेळीच उपचार मिळाल्याने ते सुखरूप आहेत.डॉ.अतुल टेंभुर्णे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *