कोणत्याही पक्षात जाणार नाही भाजपच राहणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :-मी २००९ पासून ते २०१९ पर्यंत भाजपमध्येच आमदार राहिलो ,मंत्री झालो आणि या पुढे ही भाजपमध्येच राहणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी केले. १५ आॅक्टोबरला निवडणूक ची आचारसंहिता लागू होताच राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आणि अशाच नेत्यांची इच्छुकांची या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याची बातमी सुरू असतानाच जिल्ह्यातील माजी मंत्री राजकुमार बडोले हे घड्याळ घालणार अशी बातमी बुधवारी दिवसभर माध्यमातून एका वृत्तवाहिनीवर सुरू असताना या संदर्भात गुरूवारी माजी मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विचारले असता माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की मी २००९ पासून २०१९ पर्यंत भाजपमध्येच आमदार होतो आणि मी यापुढेही भाजपमध्येच राहणार असे म्हणत त्यांनी गोंदिया जिल्ह्यात आणि राजकीय वतुर्ळात सुरू असलेल्या त्यांच्या घड्याळ पक्षात जाण्याच्या बातमीला पूर्णविराम लावला आहे. पुढे बोलताना राजकुमार बडोले म्हणाले की अशा प्रकारची बातमी मी पण ऐकली आहे आणि या बातमीत काही तथ्य नाही. असे म्हणत राजकुमार बडोले यांनी या आशयाच्या बातमीचा पूर्णपणे खंडन केलेला आहे.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अशात एका वृत्त्- ावाहिनीवर भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात असून लवकरच ते हाती घड्याळ बांधणार असल्याचे वृत्त प्रसारित केले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वतुर्ळात पुन्हा खळबळ उडाली होती. या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी हे नवीन समीकरण तयार झाले आहे. त्यात अजुर्नी मोरगाव मतदारसंघ महायुतीत नेमका कुणाच्या वाट्याला हे अद्यापठरलेले नाही, तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असल्याचे या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी हे नवीन समीकरण तयार झाले आहे. त्यात अजुर्नी मोरगाव मतदारसंघ महायुतीत नेमका कुणाच्या वाट्याला हे अद्याप ठरलेले नाही, तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे दुसºया पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा एका वृत्तवाहिनीने बडोले हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात असून लवकर ते हाती घड्याळ बांधणार असल्याचे वृत्त प्रसारित केले. असल्याने जिल्ह्यातील राजकीय वतुर्ळात खडबड उडाली होती पण हे झालेले वादळ माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या विधानाने यावर आता पूर्णविराम लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *