भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्फोटके तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया १४ साच्यांची (डाय) चोरी करताना दोन कंत्राटी कामगारांना मंगळवारी रात्री सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना भंडारा आॅर्डिनन्स फॅक्टरीमध्ये घडली, तपासादरम्यान त्यांच्याकडून १४ साचे जप्त करण्यात आले आहेत. या चोरीमागील त्यांचा उद्देश काय होता, हा आता तपासाचा भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आॅर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा येथील कॉर्पोरटीकरणानंतर उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. आॅर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा हा स्फोटक सामग्री बनवणारा कारखाना आहे.
येथे देशाच्या सु-रक्षेसाठी वापरले जाणारे अनेक प्रकारचे स्फोटक साहित्य तयार केले जाते. कारखान्यातील देखभाल व देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी पाळीत कामावर येणाºया कामगारांची तपासणी सुरक्षारक्षकांकडून केली जाते. दरम्यान, १० आॅक्टोबरच्या संध्याकाळी, नियमित तपासणी दरम्यान, सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणारा मजूर महेंद्र रामटेके (रा. कोंढी) याच्याकडून स्फोटके तयार करण्यासाठी वापरले जाणारे १४ साचे जप्त केले.