रवी धोतरे/ भंडारा पत्रिका लाखनी :- नुकत्याच झालेला वादळ वारा व अवकाळी पावसामुळे हाती आलेले धानाचे पिक जमीनदोस्त झाले असून ऐन कापणीच्या वेळेस तोंडात आलेला घास या अवकाळी व वादळ वाºयामुळे पार नेस्तनाभूत झाल्याने यंदाची दिवाळी कशी साजरी करावी असा गहन प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. कधी नव्हे अशी यावर्षी निसगार्ने साथ देवून शेवटपर्यंत धानपिकाला वेळोवेळी पाण्याची साथ दिली. यावर्षी उत्पादन चांगले होईल या आशेने शेतकरी आनंदी होता. आणि त्यादृष्टीने शेतकºयाने नवनवीन योजना आखल्या आणि ऐन कापण्याच्या वेळी निसगार्ने दणका देऊन त्यांच्या आशा मातीमोल केल्या. आता निवडणुकीचा हंगाम असल्यामुळे नेते मंडळी आंदोलन मोर्चे काढू शकत नाही मात्र मायबाप सरका- रने शेतकºयांच्या व्यथा जाणून घेण्याचा थोडा तरी प्रयत्न करून त्यांच्या अधिनस्थ असणाºया गलेलठ्ठ वेतन घेणाºया पांढºया हत्तींना शेतात जावून निदान पंचनामे करण्याचे आदेश द्यावे जेणेकरून त्यांच्या पायामध्ये शेतकरी तुडवला जाणार नाही.
एकीकडे एक रुपयात विमा देण्याचे शासन सांगत असले तरीही तेवढे प्रचंड नुकसान होवूनही ना अधिकारी बांधावर, ना विमा कंपन्या धुºयावर .. अश्या स्थितीत शेतकºयाचा मात्र पार चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कधीच अपेक्षा ठेवत नसतो. त्याने परिपक्व केलेल्या पिकावर संसाराचा उदरनिर्वाहाचा गाडा चालवत असताना चिमण्या पाखरे जनावर यांचेही पोट भरत असतो मात्र कधीही रडकुंडीस येत नाही उलट त्याची दान करण्याचीच वृत्ती असते परंतु त्याच्यात अस्मानी व सुलतानी संकट पार करण्याची शक्ती नसते कधी निसर्ग ऐन वेळी दगा देतो तर कधी सुलतान वेगळा आदेश काढतो आस्मानी संकटावर मात करण्याची त्याच्यात ताकद नसली तरीही सुलतानी संकटाला जागा दाखवण्याची ताकत त्याच्यात आहे हे विसरूण चालणार नाही.