भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील आयटक प्रणित विविध कार्यालय व विभागातील अंशकालीन, कंत्राटी, मानधनी, रोजंदारी, असंघटित कामगार, निराधार यांची बैठक दिनांक २० आॅक्टोबर २०२४ ला राणा भवन भंडारा येथे कॉम्रेड भगवान मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली व आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तसेच कॉम्रेड गजानन पाचे, वामनराव चांदेवार व ज्ञानेश्वर वाघाये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. दिनांक ३० आॅक्टोबर २०२४ पर्यंत सर्व असंघटित कामगारांना तसेच निराधारांना मानधन व वेतन न मिळाल्यास ३१ आॅक्टोबरला दिवाळीच्या पूर्वसंध्येला संबंधित कार्यालय व विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
तेंव्हा त्वरित वेतन, मानधन व निराधारण अनुदान देण्यात यावे असे आवाहन आयटकचे हिवराज उके यांनी केले आहे. तसेच याप्रसंगी कामगार कर्मचाºयांचा महासंघ व देशातील पहिली कामगार संघटना आयटक- आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस च्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ३१ आॅक्टोबर २०२४ रोज गुरुवार ला दुपारी २.३० वाजता आयटक कार्यालय राणा भवन भंडारा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आयटक प्रणित सर्व कामगार संघटनांच्या जसे अंगणवाडी, आशा, शापोआ, ग्रामपंचायत, स्त्री परिचर, नर्सरी कामगार, घर कामगार, बांधकाम कामगार इत्यादी सर्व प्रकारचे असंघटित, अंशकालीन कामगार व निराधार या सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.