भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाºया सायबर विभागाच्या मार्फत चुकीची माहिती तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सोशल मीडिया अकांऊटची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. समाज माध्यमे सर्वाच्या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वाºयासारखी पसरविण्याचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे. त्यामुळे व्हॉटसअप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुखसहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी केले आहे. उमेदवारांसाठी सूचना- सर्व उमेदवारांना स्वतच्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक, व्टिटर, इन्स्टांग्राम, ब्लॉग) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्यम प्रतिनिधीनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाज माध्यमांवरुन अफवा पसरविणे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाºया पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्हयांची नोंद होवू शकते. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आह