अखेर …..खेमराज वर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नजीकच्या सावरी येथील खेमराज अरुण नान्हे हे वडसा येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचे आज सोमवारी (ता. २१) ला सकाळी ७.३० वाजता दरम्यान गौरनगर (वडसा) जवळ अपघाती निधन झाले. त्यांचावर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सावरी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातवरणात शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारासाठी बराच जनसमुदाय जमला होता. ३ फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुलगा उज्ज्वल ने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली.

राज्य राखीव पोलीस दलातर्फे पोलीस निरीक्षक दिपक पवार, पोलीस निरिक्षक डवरे , पोलीस उपनिरीक्षक संजय नारनवरे तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी उपस्थित होते. तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. सोमदत्त करंजेकर पंचायतसमिती सदस्य विकास वासनिक, भीमराव गभने, सरपंच सचिन बागडे, उपसरपंच मंगेश धांडे, माजी सरपंच भागवत नान्हे, मोहन रेहपाडे, आई, वडील अरुण नान्हे, पत्नी राखी खेमराज नान्हे,मुलगा उज्वल खेमराज नान्हे तसेच अन्य गावकरी शोकसभेला उपस्थित होते. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. खेमराज हा साप्ताहिक रजेवर सौदळ येथे कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. आज सोमवारी (ता. २१ ) ला आपल्या कर्त्यव्यावर रुजू होण्यासाठी सकाळी ६ वाजता घरून निघाला. सकाळी ७.३० वाजता दरम्यान गौरनगर (वडसा) येथे त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, जागीच खेमराज चा मृत्यू झाला. मृत खेमराज च्या पश्च्यात आई वडील, पत्नी राखी व ५ वषार्चा मुलगा उज्ज्वल आहे. मृतक खेमराजच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *