जिल्हाधिकाºयांनी घेतला साकोली विधानसभा क्षेत्र निवडणुकीचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली येथील ६२ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी निवडणूक प्रक्रियेची तयारी, प्रशासकीय व्यवस्थापन आणि निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाºयांनी निवडणूक अधिकाºयांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता भंग होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. मतदारांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जावी, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच, मतदानाच्या दिवशी पोलिस प्रशासन, कर्मचारीवर्ग आणि स्वयंसेवकांची योग्य ती व्यवस्था सुनिश्चित करण्याची सूचना दिली आहे. मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाचा अनुभव देण्यासाठी विविध सुविधा आणि मार्गदर्शक फलक उभारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे, लाखनी तहसीलदार धनंजय देशमुख लाखांदूर तहसीलदार वैभव पवार साकोली तहसीलदार निलेश कदम, खंडविकास अधिकारी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मटाले तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छायाचित्र- नाजीम पाशाभाई,साकोली निवडणूक प्रक्रियेत कोठेही त्रुटी राहणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सतत निगराणी ठेवीत असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशित अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ तारखेपासून सुरू झाली असून आज रोजी साकोली विधानसभे करिता १२ लोकांनी २२ अर्जाची खरेदी केली आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टोबर असून ३० आॅक्टोबर अजार्ची छाननी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे त्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *