भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आम. नरेंद्र भोंडेकर यांना उपनेते पदाची घोषणा होताच भंडारा विधानसभाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात आनंदाची लाट बघायला मिळत आहे. सोमवारी सायंकाळी आम. भोंडेकर यांचे नागपूर विमानतळावर शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आणि पक्ष मजबूत करन्याकरीता जोमाने काम करण्यात येणार असे वचन दिले. पक्षाचे उपनेते हा पक्षातील दुसºया क्रमांकाचे प्रतिष्ठित पद असून शिवसेना स्थापणे नंतर पूर्व विदर्भा करीता मिळालेला हा मोठा सम्मान आहे. या पूर्वी सत्ता कुणाचीही असो विदर्भ नेहमी विकास आणि पद दोन्ही कडून उपेक्षितच राहिले. शिवसेना स्थापणे नंतर ही पक्षाच्या मजबूती करिता वरिष्ठ नेत्यांकडून कधीच मदतीचा हात किंवा मोठे पद विदर्भात दिले गेले नाही. परंतु शिवसेनेचे शिंदे गट स्थपित होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ कडे विशेष लक्ष दिले आणि विकास करीत हवा तेवढा निधी दिला आणि आता आम. नरेदर भोंडेकर यांना पक्षात दुसºया क्रमांकाची प्रतिष्ठा ठेवणारे असे उपनेते पद देऊन ही सिद्ध केले की त्यांना विदर्भावर प्रेम असून विदर्भात त्यांना सांगठनात्मक कार्य सुद्धा करायचे आहे.
आम. भोंडेकर यांना उपनेते पद मिळताच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असून आता पक्ष बांधणी करीता ते नव्याने कमाल लागतांना दिसून येत आहेत. या वेळी पत्रकारांशी बोलतांना आम. भोंडेकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास माज्यावर दाखविला आहे तो आज पर्यन्त कोणत्याही नेत्याने विदर्भावर दाखविला न्हवता म्हणून मी तो विश्वास तुटू देणार नाही. शिवसेनेला भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पूर्व विदर्भात कसे मजबूत करता येईल या करीता मी पुढील वाटचाल तयार करणार आहो. आणि यात माझे शिवसैनिक माज्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास ठेवतो.