भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अकोला येथील योगेंद्र यादव यांच्या सभेत झालेला गोंधळ म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी आपसात केलेली हाणामारी आहे यात त्यांच्याच एका अन्सारी कुरेशी नावाच्या कार्यकर्त्याच्या नाकाचा हाड मोडला असून ते इस्पितळात उपचार घेत आहेत या प्रकरणात योगेंद्र यादव यांच्या कुणाही कार्यकत्यार्ला काही काहीही इजा झाली नाही त्यामुळे योगेंद्र यादव यांच्या माध्यमा समोर येऊन करण्यात येत असलेलं रडगाणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच म्हणावा लागेल अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रचाराच्या नारळ फोडायला आज २२ आॅक्टोबरला गोंदिया येथे आले होते दरम्यान त्यांची जाहीर सभा ही झाली यानंतर माध्यमांनी काल अकोल्यात झालेल्या गोंधळाबद्दल त्यांना विचारले असता ते माध्यमासमोर आपल्या पक्षाची बाजू मांडत होते. हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी काल अकोल्यात केली होती. केली. तसेच वंचितच्या पदाधिकाºयांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर लाजिरवाणी वेळ आणली, असे देखील ते म्हणाले होते.
या प्रश्नाच्या उत्तरात एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी सदर उद्गार माध्यमांसमोर व्यक्त केले. पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात एडवोकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्यातील सुमारे १५० जागी आपल्या उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या एका प्रवक्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असल्याचे तसेच खासदार संजय राऊत आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली असल्याचे वक्तव्य करून खळबळ वाजवली होती या प्रश्नाचा उत्तर देताना एड- वोकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत. निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा ही एकत्रित येणार आहे. अशी भीती व्यक्त होत आहे.त्यामुळे लोकशाही वादी आणि मुस्लिम समाजाने यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि यांना मतदान करू नये कारण येणाºया दिवसात उद्धव ठाकरे हे भाजपा बरोबर जातील असा गोफ्य स्फोट त्यांनी गोंदिया येथे केला. तर उद्धव ठाकरेंसोबत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस यांना मुस्लिम समाज असं सांगत आहे की त्यांच्या कडून लिहून घ्या की ते पुढचे पाच वर्ष तुमच्या सोबत राहतील. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांना कशा पद्धतीने आश्वासन देते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. असे ते गोंदियात जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे जाहीर सभे साठी आले असताना बोलले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सतीश बनसोड, राजू राहुलकर, विनोद मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे अजुर्नी मोरगावचे उमेदवार दिनेश पंचभाई आदी उपस्थित होते.