धान रोगावर… अन् अधिकारी दौºयावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यात सध्या अवकाळी पावूस वादळ आणि धानावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या सर्व संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना त्यावर कोणता उपचार करावा या विवंचनेत असताना शासनाचा कृषी विभाग शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे. सर्व सामान्य शेतकरी कृषी सहाय्यकाला भ्रमणध्वनी वर संपर्क करतो तेव्हा एकतर त्याचा मोबाईल बंद असतो तर कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो, आणि चुकीने जर मोबाईल लागलाच तर ‘मी दौºयावर आहे, फिल्ड वर आहे, इकडे आवाज येत नाही, आल्यावर फोन करतो’ असे सांगून वेळ मारून नेत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. यातील काही सहाय्यकांना कोणत्यारोगावर कोणती औषधी फवारणी करावी याची सुद्धा माहिती नसते. तेव्हा गुगल वर रोगाचे नाव टाकून औषधीची माहिती सबंधित शेतकºयाला दिली जात आहे. एकीकडे कृषी शिक्षणाची पदवी घेवून नौकरीला लागायचे आणि दुसरीकडे बांधावर न जाताच गुगल ची औषध सांगायचे आणि आपली जबाबदारी दौºयावर असल्याचे सांगून झटकून द्यायचा यामुळे हा विभाग शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे.

शासनाकडून शेतकºयांच्या नावावर गलेलठ्ठ वेतन घेवून शेतकºयांनाच मात्र ठेंगा दाखविण्याचा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात सुरुआहे. एक तालुका अधिकारी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक असे मिळून तालुक्याचा कारभार पाहण्याची यंत्रणा शासनाकडून निर्माण केली असली तरीही शासनाच्या विविध योजना, प्रकल्प कृषी साहित्यावांवर अनुदान बी बियाणे, रासायनिक खते इत्यादी योजना शासन शेतकर्यांसाठी बेधडकपणे राबवीत असले तरी शासनाच्या योजना फक्त आपल्या विशिष्ठ मर्जीतील व्यक्तींना पुरविण्यात हा विभाग धन्यता मानत आहे. तर काही तालुका, मंडळ अधिकारी सभेचा बहाणा करून शेतकºयांना उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकºयांना गुगल वर ओषधी पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हा विभाग कशासाठी? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *