भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची कुनकुन लागताच सिहोरा पोलीसांनी सापळा रचला व सोंड्या टोला डॅम कडून येणाºया २ टिप्पर व १ जेसीबी महालगाव फाट्यावरून २३ आॅक्टोंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. असून काल २४ आॅक्टोंबर रोजी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यात २ टिप्पर, १ जेसीबी, ८ ब्रास वाळू, २ मोबाईल व इतर साहित्यसह ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या गुन्हातील आरोपी आतीश तुकडुजी पटले वय २८ वर्ष रा. डोंगरला, दिनेश सुदाम मोहनकर वय २२ वर्ष रा. खापा, गौरीशंकर उर्फ गोलु सुधाकर शेंडे वय २५ वर्ष रा. खरबी, चंद्रशेखर शंकर कुसराम वय २५ वर्ष रा. सिहोरा, मोरेश्वर उर्फ शुभम रामा देव्हारे वय २४ वर्ष रा. मोहाडी खापा, राकेश रामकृष्ण राउत वय ३५ रा. डोंगरला यांचेवर काल २४ आॅक्टोंबर रोजी अपराध क्रमांक २५४/ २०२४ कलम ३०३(२) ४९, सह कलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ७/९ पर्यावरण संरक्षण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात टिप्पर क्रमांक एम एच ४०/ बीजी ३४३४, टिप्पर क्रमांक एम एच ३६/ एफ ३९२१, प्रत्येकी दहा लाख प्रमाणे २० लाख, प्रत्येकी ४ ब्रास रेती प्रत्येकी ८ हजार प्रमाणे १६ हजार रुपये, २ मोबाईल प्रत्येकी १५ हजार एकूण ३० हजार, विना क्रमांकाची जेसीबी किंमत २५ लाख, असा एकूण ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर यांनी आपले पोलीस कर्मचारी राजू साठवणे, तिलक चौधरी, महेश गिºिहपुंजे, नोबेस मोटघरे यांचे सहकार्याने कारवाई केली.