भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२४ संदर्भात जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे, प्राचार्य, डाएट भंडारा श्रीमती रत्नप्रभा भालेराव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ योजना) रवींद्र सोनटक्के, जिल्हा परीरक्षक महेंद्र लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी हरेश अंबादे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील एकूण ३० परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे. पेपर १ चे ३४७६ व पेपर २ चे ४०४० परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत.
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न
